महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. या निमित्ताने कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी म्हणून जवळच्याच गोवा राज्यातून मद्याच्या बाटल्या घेऊन जाण्याचे प्रकार घडत आहेत. ही तस्करी वाढली आहे. याच प्रकारे दारूचे चौतीस बॉक्स गोव्यातून महाराष्ट्र कडे नेण्यात येत असताना चिक्कोडी विभागाने कारवाई केली आहे.
ब्लेंडर प्राइड रॉयल चॅलेंज डॉक्टर ब्रँडी अशा प्रकारच्या 3 लाख 49 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या गाडीतून जाणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे .एकूण साडे सहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. विशाल जयवंत कुडतरकर राहणार सावंतवाडी त्याला अटक झाली आहे या प्रकारातून चोरट्या मार्गाने गोव्यातून होणारी तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे. पोलीस लक्ष देऊन असले तरी अनेक छुप्या मार्गांचा वापर केला जात आहे.
महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लवकरच निवडणूक होणार आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. रणधुमाळी होण्यापूर्वी कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यासाठी दारूचा वापर राजकारणी व्यक्ती कडून करण्यात येत आहे. दारूच्या बाटल्या घेऊन जाणे मागे हेच कारण असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या तस्करीला गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी आवर घालण्याची गरज आहे.