विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अथणीचे ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण सवदी यांना भाजप हायकमांडने उपमुख्यमंत्रीपद बहाल करून त्यांच्याकडे परिवहन खातेही सोपवले. त्यानंतर आता मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी त्यांच्याकडे कृषी खातेही सोपवले आहे.त्यामुळे सवदी यांना चांगले कार्य करून जनतेवर आणि भाजप श्रेष्ठींवर छाप उमटवून दाखविण्याची संधी लाभली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून महाराष्ट्राचे प्रभारी म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी पक्षाने दिली आहे.महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यावर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी सांगलीत भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचीच बैठक घेतली.
सवदी यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.कार्यकर्त्यांचा संचही त्यांच्याकडे आहे.पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे संबंध चांगले असल्याचा फायदा त्यांना भविष्यात होणार आहे.कृषी मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यामुळें शेतकऱ्यांसाठी चांगले कार्य करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची संधी मिळाली आहे.
या संधीचा त्यांनी उपयोग करून शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या तर त्यांची प्रतिमा अधिकच उंचावेल यात शंका नाही.मागील भाजप सरकारच्या कार्यकाळात कृषी मंत्री पद बेळगाव जिल्ह्यकडे होते तात्कालीन कृषी मंत्री उमेश कत्ती यांनी कृषी बजेट वेगळा करून आपली छाप पाडवली होती आता सवदी यांना देखील परिवाहान कृषी दोन्ही ठिकाणी आपली चमक दाखवण्याची संधी आहे.