कर्नाटक राज्यातल्या भाजपा सरकार च्या भवितव्याची समजली जाणारी पंधरा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तारीख ठरली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार पुढे गेलेली पोटनिवडणूक निश्चित करण्यात आली आहे.
आगामी पाच डिसेंबर रोजी या पंधरा जागांसाठी मतदान होणार आहे त्यासाठी 11 नोव्हेंबरपासून निवडणुकीची अधिसूचना लागू होणार आहे.अशी असेल नवीन निवडणूक प्रक्रिया
11 नोव्हेंबर निवडणूक अधिसूचना लागू
18 नोव्हेंबर नामांकन करण्याची शेवटची तारीख
19 नोव्हेंबर पासून अर्जांची छाननी
21 नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख
5 डिसेंबर मतदान
आमदारांची अपात्र अंधारामुळे निवडणूक आयोगाने 17 पैकी 15 विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शुक्रवारी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने ब्रेक दिल्या नंतर 21 ऑक्टोबर रोजी होणारी पोट निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आता निवडणूक आयोगाने पुढची डिसेंबर महिन्याची तारीख जाहीर केली आहे.एकूण 15 पैकी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक अथणी आणि कागवाड मध्ये पोट निवडणूक होणार आहे.