Friday, December 20, 2024

/

विसर्जन मिरवणुकीत कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू’

 belgaum

डॉल्बी गाडीचा अपघात होऊन  कामत गल्ली येथील युवकाचा मृत्यू झाला आहे.राहुल सदावर वय38असे त्याचे नाव असून तो विवाहित आहे त्याला दोन लहान मुली आहेत.

सकाळी आठ वाजता विसर्जन मिरवणुकीत हुतात्मा चौकात ही घटना घडली आहे घटना घडताच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत घटने नंतर तो गंभीर जखमी होता अखेर सिव्हिल मध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटने नंतर मिरवणुकीत सर्व मंडळांनी डॉल्बी बंद करून या युवकाला आदरांजली वाहिली.

बेळगावात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत झालं असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेनंतर लागलीच कामत गल्लीतील मंडळाने जक्कीन होंड तलावात गणेश विसर्जन केले. अश्या घटना टाळण्यासाठी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सावधानता बाळगण्याची गरज आहे.

दुपारचे एक वाजे पर्यंत कपिलेश्वर दोन्ही तलावात 150 हुन अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले असून अजून 15 मूर्ती विसर्जित होने बाकी आहे सायंकाळी चार वाजता शेवटच्या मूर्तीचे विसर्जन होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.