संपूर्ण घर कोसळलेल्याना एक लाखाची मदत त्वरित घर बांधण्यासाठी देण्यात येईल.पुराग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी एक हजार कोटी निधी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत बैठक झाली.पीक हानीचा अहवाल आल्यावर एन डी आर एफ च्या मार्गसूचिनुसार मदत देण्यात येणार असून सरकार देखील अधिक मदत देणार आहे.केंद्र सरकारकडे निधी मागितला असून केंद्र सरकार लवकरच निधी देणार आहे.बेळगाव जिल्ह्याला दोनशे कोटी रू मदत राज्य सरकार देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
पूरग्रस्त भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पाचशे कोटी यापूर्वीच मंजूर झाले आहेत.पूरग्रस्त भागातील स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असे शेट्टर म्हणाले.दोनशे कोटी बेळगाव जिल्ह्यला मंजूर करू असे याअगोदर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तर राज्यात 500 कोटी पूर ग्रस्तां साठी खर्च। करणार आहोत असे शेट्टर म्हणाले.