कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातुन आलेल्या उद्योजकां सोबत थेट संवाद साधला आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत महाराष्ट्रातील उद्योजकांनी कर्नाटकात यायला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.
एकूण सात संघटनांच्या चाळीस हुन अधिक महाराष्ट्रातील उद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. या उद्योजका बरोबर ही पहिली बैठक असून पुढील बैठकीत याबाबत ठरवू असे ते म्हणाले.नव्या औद्योगिक धोरणाची माहिती देताना ते म्हणाले ,नव्या औद्योगिक धोरणाचा आराखडा तयार असून हे नवे धोरण नोव्हेम्बर किंवा डिसेंम्बर पासून अंमलात आणले जाईल. गुजरात,मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यात औद्योगिक विकास कौतुकास्पद झाला आहे. त्यामुळे त्यांच्या औद्योगिक धोरणांचा अभ्यास करून नवे औद्योगिक धोरण तयार करण्यात आले आहे.उत्तर कर्नाटकात औद्योगिक अदालत भरवण्यात येणार असून वीज,जमीन,रस्ते आणि पाणी आदी बाबींच्या समस्या या अदालतीत सोडवण्यात येतील.
उद्योजकांच्या बैठकीत वाणिज्य आणि औद्योगिक खात्याचे मुख्य सचिव गौरव गुप्ता यांनी बैठकीत प्रेझेंटेशन दिले. कर्नाटकात गुंतवणूक दारांसाठी असलेले पोषक वातावरण,औद्योगिक धोरणे यामुळे उद्योजक गुंतवणुकीसाठी कर्नाटकला प्राधान्य देत आहेत.त्यामुळेच वाहन,वाहनांचे भाग,इलेक्ट्रिक वाहने,फौंड्री ,मशीन टूल्स,टेक्सटाईल आणि कापड उद्योगात कर्नाटक आघाडीवर आहे.उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि धोरण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे.गुंतवणूक दारांसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यास कर्नाटक कटिबद्ध आहे असे गौरव गुप्ता यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या उद्योजकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
इचलकरंजी इंजिनियरिंग असोसिएशन,उत्कर्ष उद्योजक संस्था,कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएशन,शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन,कागल आणि हात कनांगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन,गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि श्री लक्ष्मी इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांनी बेळगाव जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासंबंधी उद्योग मंत्र्यांना निवेदने दिली.
बैठकीत प्रत्येक उद्योजकाशी संवाद साधण्यात आला.मे इंडो काऊंट इंडस्ट्रीज ,मुंबई,मे गोदावरी बायो रिफायनरीज,मुंबई,मे जिना स्पेशल स्टील वर्क्स,क्वालिटी अनिमल फिडस बेळगाव,मव विजयशांती ऍग्रो बेळगाव,मे अशोक आयर्न बेळगाव,श्री आनंद लाईफ सायंसिस बेळगाव आणि अन्य उद्योग बेळगाव जिल्ह्यात ५७० कोटींची गुंतवणूक करणार आहेत.