मार्कंडेय साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज झाली आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या नेतृत्वाखालील पोतेदारी पुन्हा सुरू झाली आहे. आणखी सात कोटीची गरज असून आणखी भागधारकांनी शेअर्स जमा करून द्यावेत अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.
यावर्षीचा गाळप हंगाम सुरू करायचा असल्यास आम्ही तयारीत आहोत. आम्हाला आणखी शेअर्स जमा करावे लागणार आहेत. अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. अपेक्स बँकेकडून आणलेल्या निधीचे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आले आहेत असे आरोप होत आहेत. हे गैरकारभार समोर आल्याने बैठकीत गोंधळ झाला आहे.
चेअरमन अविनाश पोतदार यांनी आजपर्यंत फक्त दरवर्षी कारखाना सुरू करणार हे पालुपद सुरू करून दरवर्षी पैसे खाण्याचा प्रकार सुरू आहे. असेही आरोप या बैठकीनंतर होत आहेत. अनेक संचालकांनीही अनेकवेळा पैसे जमा करून दिले आहेत. पण अनेकदा बॉयलर प्रदीपन करून कारखाना सुरू झाला नाही. याबद्दल उपस्थित समभाग धारकांनी आवाज उठवताच एम आर पी प्रमाणे दर देऊ असे सांगण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी एम आर पी चा नेमका अर्थ सांगा असा प्रश्न उपस्थित केला. पण हा अर्थ कधीच सुरू न झालेल्या कारखान्याच्या त्या पोतेदारी करणाऱ्यांना देता आला नाही.
सध्या 8800 समभाग धारक असून प्रत्येकाने 4000 रुपये भरले आहेत. तर इतर समभाग धारक असून त्यांची संख्या 13 ते 14 हजार आहे. त्यांचे समभाग कमी असून मागील 30 वर्षात त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. आता तुमचे समभाग कमी आहेत असे सांगून पुन्हा त्यांचे पैसे पण दरवर्षी होणाऱ्या बॉयलर प्रदीपन साठी करण्यात येणार आहे काय असा प्रश्न काही समभाग धारकांनी उपस्थित केला आहे.
आज पुन्हा ब्रॉयलर प्रदीपन करून पाने पुसण्यात आली असून दसऱ्याच्या दरम्यान पुन्हा गाळप सुरुवात करण्यात येणार आहे. असे सांगण्यात आले आहे. सात कोटी जमा करणार असे सांगून पुन्हा समभाग जमा करण्यात येणार आहेत. एक संचालकाने पैसे दिलेत असे सांगण्यात येत असले तरी सर्व संचालकांनी पैसे दिलेले आहेत.पण त्यापैकी काही जणांना व्याजाने पैसे परत दिले आहेत. ब्रॉयलर प्रदीपन हे दर वर्षीचे नाटक झाले आहे. आता समभाग धारकांना व्याजाने पैसे कधी मिळणार असे विचारण्यात येत आहे.
पत्रकारांनी उलटी बातमी दिली की ते पैशासाठी करतात असे सांगून आपण स्वतः भ्रष्ट आहे असे दाखवून देणारे पोतेदार पुन्हा पुन्हा नागरिकांची दिशाभूल करत असून कारखाना सुरू करतो हे दरवर्षीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना खुळे करण्याचा डाव सुरू आहे. अशीही चर्चा समभाग धारकात ऐकायला मिळाली आहे.