माझं नशीब खुलल तर आगामी दिवसात मी नक्कीच मुख्यमंत्री होईन असा विश्वास माजी मंत्री उमेश कत्ती यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री होण्याची क्षमता सर्व गुण माझ्यात आहेत असें दुसरं कुणी म्हटलं नसून स्वतः कत्ती यांनी हे वक्तव्य केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्या मुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं आहे.
बुधवारी बेळगावात पत्रकारांना शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय या अगोदर गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्यांनी कर्नाटकात सत्तापरिवर्तन होणार बेळगावातून जनता दल काँग्रेस सरकारचा अस्त होणार असं वक्तव्य केले होते आणि राहणार असं त्यानंतर दोन महिन्यांत कर्नाटकात भाजपचे सरकार सत्तेत आले होते. त्यांना अनुभवी असून देखील मंत्रिमंडळातुन डावलले होत मात्र मी मुख्यमंत्री होईन माझ्यात सी एम होण्याची योग्यता आहे असा नवीन बॉम्ब टाकल्याने राजकिय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
मी आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेलो आहे सभागृहातील कामकाजाचा मला अनुभव आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्याच्या सगळी क्षमता योग्यता माझ्यात आहे मुख्यमंत्री झालो तर उत्तर कर्नाटका चा विकास करून दाखवतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी पोटनिवडणुकीत कर्नाटक राज्यात 15 पैकी 15 जागांवर भाजपचा विजय होईल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला अथणी मतदारसंघातून लक्ष्मण सवदी कागवाड मधून राजू कागे तर गोकाक मधून अशोक पुजारी यांना तिकीट मिळेल अन ते निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बी एस येडियुरप्पा हे आतापर्यंतचे सर्वात कमकुवत मुख्यमंत्री आहेत असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला होता त्यावर मत व्यक्त करा असं पत्रकारांनी प्रश्न विचारल असता त्यानी या प्रश्नाला बगल देत यांनी चुप्पी साधली.