गणपतीबाप्पाला घेऊन जात असताना धनश्री गार्डन जवळ भाग्यनगर येथील घटना घडली त्या घटनेचे नेमके जबाबदार कोण? हेस्कोम चे अधिकारी की कार्यकर्ते हा प्रश्न उपस्थित होत आहे. उंच मूर्ती घेऊन जाताना त्याला तारांचा स्पर्श झाला हे जरी खरे असले तरी मूर्ती वाहनावर होती. त्यामुळे त्याची उंची अधिकच वाढू शकते याचा विचार करूनच हेस्कोम ने उपाययोजना करायला हवी होती .
खरे तर दोन-तीन दिवस वीज पुरवठा खंडित ठेवूनच दुरुस्ती काम केल्याचे सांगितले .पण अजून त्यांचा स्पर्श होऊ लागला आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
या मूर्तीवर झाकलेल्या प्लास्टिकला तारेचा स्पर्श झाला आणि आग लागली, कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवून ती वीजवली अशा घटना घडू नये म्हणून कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कुठेही गणपती नेताना तयार लागत असल्याचे लक्षात आल्यास त्याची वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे.