हिंदु मुस्लिम शिख इसाई अशा धर्मांपेक्षा मानवतेचा धर्म खूप मोठा असून आपण केलेल्या समाजकार्याला माझा सलाम अशा शब्दात जायन्ट्सचे सुनील भोसले यांनी मुस्लिम समाजातील या समाजसेवकांचा गौरव केला.
प्रास्ताविकात जायंट्सच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती देत असतानाच जातीय सलोखा राखण्यासाठी कार्य करावे असे सुचविले.मोहन कारेकर,मुजममील डोणी,उपेंद्र बाजीकर यानी आपले विचार मांडले.
इंदोर येथील एक मूकबधिर युवक महिन्याभरापूर्वी भटकत भटकत बेळगाव येथील खंजर गल्लीत फिरताना स्थानिक लोकांना दिसला पण त्याला बोलता व ऐकू येत नसल्याने त्यांचे नाव पत्ता काहीच कळत न्हवते अशा युवकाला गेला महिनाभर सामाजिक कार्यकर्त्यांनी सांभाळले आणि काही युवकांनी सोशल मीडियाचा वापर करून त्याचा पत्ता शोधून काढला आणि तो इंदोर, मध्यप्रदेश येथील कृष्णा चौहान असल्याचे उघडकीस आले मग तेथील पोलीस यंत्रणेने बेळगावमधून त्या युवकास ताब्यात घेऊन त्यास पालकांच्या स्वाधीन केले.अशा या मूकबधिर युवकाचे संगोपन करणाऱ्या सहा जणांचे मान्यवरांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र आणि मिठाई देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी असंख्य जायंट्स सदस्य आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन पुंडलीक पावशे तर आभार सुनिल मुतगेकर यांनी मांडले