बेळगावचे सुपुत्र आणि कारवार जिल्ह्यात सेवा बजावत असलेले डी एस पी शंकर मारिहाळ हे रविवारी सायंकाळी पासून बेपत्ता आहेत.
कद्रा आणि गारे परिसरात गस्तीसाठी किंवा इतर कामासाठी गेलेले कारवार चे डीएसपी शंकर मारिहाळ रविवारी सायंकाळी पासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.त्यांच्या सोबत आणखी एक पोलीस होता. मारिहाळ व त्या पोलीसाचा संपर्क होत नसल्याने शोध सुरू आहे. रस्ता चुकल्याने जंगल भागात अडकले की दुसरी समस्या आहे, याचा तपास सुरू आहे.शंकर मारिहाळ हे बेळगावचे असून काही महिन्यांपासून कारवार येथे सेवेत आहेत.
तपासासाठी पथके स्थापन
रात्री शोध लागला नसल्याने आता दिवसाच्या प्रकाशात शोध सुरू करण्यात आला आहे.त्यांच्या सोबत आणखी एक पोलीस होता. मारिहाळ व त्या पोलीसाचा संपर्क होत नसल्याने चिंतेत वाढ झाली आहे. रस्ता चुकल्याने जंगल भागात अडकले की काळी नदीच्या वाढलेल्या पाण्याचा फटका त्यांना बसला आहे? याचा शोध सुरू आहे.
डीएसपी मारिहाळ बेपत्ता प्रकरणी कारवार येथील पोलीस कंट्रोल रुमनेही दुजोरा दिला.कद्रा आणि गारे परिसरात गस्तीसाठी गेलेले कारवार चे डीएसपी शंकर मारिहाळ आज सायंकाळी पासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
एक प्रकरणाच्या चौकशीसाठी बारे या गावी गेले होते. मल्लापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे गाव आहे. तेथून परतताना ते बेपत्ता झाले की जात असताना हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.कारवार पोलीस प्रमुखांनीही सर्व तपास पथकांना त्वरेने काम करण्याची सूचना केली आहे.
नुकताच मारिहाळ यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते बेळगाव शहरात अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावली होती ते सुख रूप परतोत अशी भावना बेळगावकर जनतेत व्यक्त होत आहे.