काँग्रेस आणि जेडीएस सरकारला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तत्कालीन सभापती रमेश कुमार यांनी अपात्र ठरवलेल्या त्या आमदारांचे भवितव्य आज ठरणार होते, मात्र सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलून 25 सप्टेंबरला गेल्यामुळे आता त्यांचे भवितव्य 25 सप्टेंबरला ठरणार आहे.कर्नाटकातील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. पंधरा जागांवर पोटनिवडणुका होणार आहे.
सतरा अपात्र आमदारांनी आपल्याला पात्र ठरवावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे . पोट निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत आहे .अशा पातळीवर आजच्या आज निकाल लागावा अशी अपेक्षा होती. पण ते काम होऊ शकले नाही. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा कामकाज पुढे टाकले असून 25 सप्टेंबर तारीख जाहीर केले आहे.
25 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार की याचिकेवर निकाल लागणार हे स्पष्ट झालेले नाही. याचिकेवर सुनावणी झाली तरी आमदारांचे भवितव्य अधांतरीच ठरू शकते .याचिकेवर 25 सप्टेंबरला सुनावणी झाल्यास तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज भरून या निवडणुकीत आपले भविष्य आजमावण्याची संधी मिळणार आहे. शिवाय अपत्रता रद्द झाली तर पोट निवडणूक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र पात्र ठरवण्यात आले तर पोटनिवडणुकीची गरजच नाही असा युक्तिवाद निवडणूक आयोगासमोर सादर केला जाऊ शकतो. किंवा पाच वर्षे किंवा सहा वर्षे निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाहीत हा मुद्दा घेऊन न्यायालयाने एखादा चांगला निर्णय दिल्यास त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ शकते. अन्यथा या वेळची निवडणूक लढवता येत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे.