दिल्ली आणि गुजरात सह अनेक राज्यात चायनीज मांजाच्या विक्रीस बंदी आहे मात्र असा धोकादायक चायनीज मांजाची विक्री बेळगावातील अनेक भागात होत आहे.
प्लास्टिकच्या सहाय्याने तयार होत असलेला मांज्याला धार असते त्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत अनेकांचे जीव जात आहेत याची छुप्या पद्धतीने खडे बाजार आणि भेंडी बाजार परिसरात होत आहे. मनपाने व पोलीस खात्याने मांजा विकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा व मांज्या विक्रीवर बेळगावात देखील बंदी घालावी अशी मागणी वाढली आहे.
(फोटो: चायनीज मांजाचा हा file फोटो आहे)
पतंगाचा मांजा गळ्याला लागून काल धामणे येथील गोदावरी बाळेकुंद्री वय 45 या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पतंग उडविण्यासाठी कॉटन आणि चायनीज नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे.चायनीज मांजा हा नायलॉनचा असल्याने जीवघेणा ठरत आहे.या मांज्याची विक्री करण्यावर पूर्वीच्या पोलीस आयुक्तांनी बंदी घातली होती.
मागच्या वर्षी काकती येथे एक डॉक्टर या चायनीज मांजामुळे जखमी झाला होता आणि त्याच्यावर बंगलोर येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.सध्या शाळांना सुट्टी जाहीर होणार आहे त्यातच पतंग उडविण्याचा मोसम सुरू झाला असून तरुणाई मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्यात गुंग झालेली असते.आपण पतंग उडविण्यासाठी वापरत असलेल्या चायनीज मांज्यामुळे एखाद्याचा जीव जावू शकतो याचे भानही यांना नसते.शहरात भेंडीबाजार परिसरात चायनीज मांज्याची चोरी छुपे विक्री होत असून पोलीस खात्यानेच मांजा विकणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.