एकीकडे बेळगाव शहरात सफाई कामगारांच्या समस्येकडे मनपा प्रशासन डोळेझाक करत असताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी सफाई कामगारांच्या समस्या सोडवणुकीसाठी प्रयत्न चालवले आहेत.
बेळगाव मनपाच्या सफाई कामगारांचा ऑनलाइन आणि इतर होणारा पगार सुरळीत करा अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजकर यांनी केली आहे. गुरुवारी सकाळी बेळगाव महापालिकेत सफाई कामगारांसह नूतन आयुक्त जगदीश के व्ही यांना समस्या अवगत करून दिल्या.नूतन महापालिका आयुक्त म्हणून जगदीश यांनी मावळते पालिका आयुक्त अशोक धूडगुंटी यांच्याकडून पदाभाराची सूत्रे सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिलाच सफाई कामगारांनी समस्या ऐकून घेतल्या.गुंजटकर यांनी सफाई कामगारांच्या वतीने मनपा आयुक्तांना पगारात होणाऱ्या त्रासा बद्दल माहिती दिली.
सफाई कामगारांच्या ऑनलाइन प्रकारांमध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करा ऑनलाईन पगार करतेवेळी कचरा उचल करणारे ठेकेदार चुका करत आहेत त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. सफाई करणाऱ्यांची दररोजची हजेरी सॅनिटरी इन्स्पेक्टर घेण्याऐवजी ठेकेदार घेत आहेत त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
मनपाच्या 548 सफाई कर्मचाऱ्यांचा पगार ऑनलाईन होत आहे दररोज सफाई करणाऱ्यांची हजेरी ठेकेदार घेत असतात त्यात हजेरी गैरहजर असलेल्या सोडून पगार करण्यासाठी ठेकेदार वेगळे पैसे मागत आहेत त्याचा त्रास सफाई कामगारांना सोसावा लागत आहे अशा भ्रष्ट कचरा ठेकेदारावर कारवाई करा अशी देखील मागणी करण्यात आली आहे यापुढे सफाई कामगारांची हजेरी सॅनिटरी इन्स्पेक्टर घ्यावी ठेकेदार त्यामुळे ऑनलाईन पगार प्रक्रिया सुरळीत होईल असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांना देखील त्यांनी सफाई कामगारांच्या समस्या बाबत निवेदन दिले प्रादेशिक कार्यालयाचे अधिकारी रमेश आणि निवेदनाचा स्वीकार केला आणि मनपा आयुक्तांना याबाबत आपण सूचना करू असे आश्वासन दिले.