बेळगाव शहराला बसलेल्या पुराचा फटका आणि झालेले नुकसान याची पाहणी करण्यासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे मंगळवारी बेळगाव दाखल होणार आहेत. ते पूर्व भागातील पाहणी करून नुकसानग्रस्तांना सहाय्य करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मंगळवार दिनांक 10 रोजी ते सकाळी साडेदहा वाजता बेंगलोर येथून सुटणार असून साडेअकरा वाजता सांबरा विमानतळावर पोहोचणार आहेत. त्यानंतर पूर्व भागातील पाहणी दौरा करून किती नुकसान झाले आहे हे याबाबत माहिती जाणून घेणार आहेत.
पाहणी दौरा झाल्यानंतर खासदार आमदार व अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते परत बेंगलोर कडे रवाना होणार आहेत. या दरम्यान पूरग्रस्तांना कोणत्या अडचणी भासत आहेत याची माहितीही ते अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहेत. त्यामुळे हा दौरा अनेकांच्या संसार उभे करणारा ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे बेळगाव दौऱ्यावर येत असल्याने विविध विषयांना उधाण आले आहे. ते दौर्यात नक्की काय करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.