Monday, December 30, 2024

/

कंग्राळी खुर्द गावात कारच्या धडकेत युवक ठार

 belgaum

बेफाम वेगाने जाणाऱ्या गोवा पासिंगच्या कारने गल्लीतून चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला पाठीमागून ठोकर दिल्याने पादचारी युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना कंग्राळी खुर्द येथे घडली आहे.
अशोक श्रीराम राजभर वय 25 (मूळचा देवडीया उत्तर प्रदेश)सध्या राहणार कंग्राळी खुर्द असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

रहदारी उत्तर विभागाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे नऊ च्या दरम्यान रामदेव गल्ली कंग्राळी खुर्द येथे ही घटना घडली आहे.गोवा पासिंग च्या कारने गल्लीतील चालत जाणाऱ्या युवकाला जोराची धडक दिली.

Car accident

कार इतक्या वेगात होती की युवकाला आदळली आणि समोरील टेलिफोन खांबाला धडकली घरासमोर लावलेली सायकल देखील चुकनाचूर झाली आहे. कारचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला असावा अशीही शक्यता व्यक्त होत आहे.

मयत अशोक हा युवक पेंटिंग काम करत होता तो मूळचा उत्तर प्रदेशचा होता कंग्राळी खुर्द येथे कामाला होता. कार चालकाचा हलगर्जीपणामुळे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावाला रोजंदारी करून उदर निर्वाह करायला आलेल्या युवकाला जीव गमवावा लागला आहे.रहदारी उत्तर पोलीस स्थानकात गुन्हयाची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक आर आर पाटील अधिक तपास करत आहेत.खेडे गावातून गल्लीत इतक्या वेगात वाहने चालवणाऱ्या वर कठोर कारवाईची गरज आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.