सध्या गणेश उत्सव आणि मोहरम सण सुरू आहे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी गणेश मंडळाचे पेंडाल मोहरमचे ताबूत जवळपास अंतरावर आहेत.अनेक वर्षे मोहरम आणि गणेश उत्सव एकत्रित रित्या यायचे आपण पाहिले आहे.झेंडा चौकात गणेश पेंडाल मोहरम ताबूत आमोरा समोर आहेत तर कॅम्प पोलीस स्थानका समोर आजू बाजूला मोहरम आणि गणेश सौहार्द तेने साजरा केला जात आहे.
बेळगाव शहराचा कॅम्प विभाग एक असा आहे जिथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सारे बांधव एकत्र येत राहतात, एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात एकमेकांच्या सणात आनंदात दुःखात सारे एकत्र येतात.सध्या गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण एकत्रित आले आहेत कॅम्पातील नागरिक गणेशाचा आणि मोहरमचा असे दोन्ही मंडप एकमेकांशेजारी घालून हे सण साजरे करत आहेत त्यामुळे जाती धर्म आणि इतर भेदभाव करणाऱ्या नागरिकांना आदर्श ठरावा असे हे काम आहे.
यासंदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य असलेले साजिद शेख यांची प्रतिक्रिया घेतली असता हे काही नवीन नाही आम्ही सगळे एकत्रित येऊन हा सण साजरा करतो गणपती आम्हाला तितकाच पवित्र आहे तितकाच मोहरम पवित्र आहे त्याचबरोबरीने दसऱ्यात ही काही मुस्लिम सण येतात त्यावेळी आम्ही एकत्र साजरे करतो. ख्रिसचन लोकांच्या सणांमध्ये आम्ही सगळेजण एकत्रित साजरे करतो असे त्यांनी सांगितले.
कॅम्प गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक भाटी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली एकमेकांशेजारी तंबू असले देवाण-घेवाण होत असली तरी तिचे वैशिष्ट्य आहे. येथे सर्व जाती-धर्माच्या लोकांची सरमिसळ आहे .कोणी आपला धर्म पुढे करून राजकारण करत नाही. एकमेकांच्या सुख दुःखात आम्ही जातो. यामुळे संपूर्ण बेळगावात कधी दंगा असला तरी येथे कधी समस्या निर्माण होत नाही. याचे हेच कारण आहे धर्म वेगळे असले तरी सगळ्यांचा देव एकच असल्यामुळे आम्ही सगळेजण सुखाने आनंदाने हे सण साजरे करतो असे सांगितले.