रविवारी भाग्यनगर येथे गणेश मूर्तीला विद्युत भारित तारा स्पर्श होऊन घटना घडली होती त्याची दखल गणेश महामंडळ आणि हेस्कॉमने घेतली आहे.
सकाळी 7:00 च्या दरम्यान अनगोळ येथील मुर्तीकार जे. जे. पाटील यांनी तयार केलेली होती. गजानन युवक मंडळ सदलगा येथील मंडळाची उंच गणेश मूर्ती नेताना भाग्यनगर चौथा क्रॉस धनश्री गार्डन जवळ ट्रॅक्टर ड्रायवरच्या चुकीमुळे रस्त्याच्या आडव्या विद्युत तारेला स्पर्श होऊन झाकलेल्या प्लास्टिक पिशवीला आग लागली असल्याची माहिती गणेश महा मंडळ व हेस्कॉम अधिकाऱ्यांनी दिली.
ही बातमी समजताच हेस्कोम अधिकारी व मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी रणजीत पाटील, गणेश दड्डीकर व ईतर कार्यकर्ते, तसेच टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर विनायक बडीगेर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या धावपळीच्या दरम्यान हेस्कॉमचे अधिकारी AEE अरविंद गदगकर व सेक्शन ऑफिसर यांनी लाइन बंद करून ती मूर्ती अडकलेल्या वायर मधून सुखरूप बाहेर काढली.
या नंतर त्या भागातील सर्व मुर्तीकारांना भेटुन विनंती केली की जे मंडळ उंच मुर्ती नेतात, त्यांनी सावधगिरी बाळगावी व मूर्ती नेताना मदत लागल्यास हेस्कॉमशी व मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाशी, तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
गणेश महा महामंडळ आणि हेस्कॉमचे संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
*मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ*
रणजीत चव्हाण पाटील
6360166195
गणेश दड्डीकर.
9844497079
*HESCOM संपर्क नंबर* *खालीलप्रमाणे आहेत :*
*AEE Arvind gadagkar* 9448370244
9480881987
*Section officer*
Madhusudhan 9480881992
Badiger 9480881993
Praveen 9480881994
Bellikatti 9480882019
Mohite 9480881995
Haibbati 9480881996
Bagewadi 9480882915