बेळगाव शहरातील वाहतुकीच्या नियमांचा नव्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. कालच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना अडवून पोलिसांनी न्यायालयाच्या नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. आणि एका व्यक्तीला मद्यप्राशन करून वाहन चालवल्याबद्दल पंधरा हजाराचा दंड घातलेली नोटीस देण्यात आली आहे.
न्यायालयात जाऊन हा दंड भरावा लागेल. त्या वेळी त्या दंडाच्या रकमेत वाढ होऊ शकते. कारण न्यायालयीन निर्णय काय होईल त्यानुसार दंड भरावा लागू शकतो. शहरात आणि कर्नाटकात नियम शिथिल करण्यात आला असल्याचे गृहमंत्री बसवराज बोंमाई यांनी जाहीर केले होते. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनीही याबद्दल निर्णय दिला आहे .
पण बेळगाव पोलिसांनी दंड आकरण्याची कारवाई सुरू असून यामध्ये भीतीचे वातावरण आहे. मद्यप्राशन केल्यानंतर घरी जाणे अवघड आहे .अशावेळी आता वाहनधारकांनी काळजी घ्यावी लागणार आहे. मद्यप्राशन करून स्वतः वाहन चालवत घरी जाणे यापुढे दहा ते पंधरा हजारांचा फटका बसणारे ठरू शकते .याचा विचार करून नागरिकांनी लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी .
मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास बसणारा इतका मोठा दंड नागरिकांच्या खिशाला परवडणारा नाही. त्यामुळे यासारख्या वाईट गोष्टींकडे वळण्यापेक्षा व्यसनमुक्त जीवन जगण्याचा निर्णय योग्य ठरेल.