Thursday, January 2, 2025

/

या विद्यार्थिनींनी साधला इस्रोच्या माजी अध्यक्षांशी संवाद

 belgaum

बालिका आदर्श शाळा नेहमी आपल्या विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृती समितीचे अध्यक्ष आणि जेष्ठ शास्त्रज्ञांशी संवाद साधला आहे. मंगळवारी इस्रोचे माजीअध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्याशी संवाद साधला. विजापूर येथील कार्यक्रमात जाण्यासाठी कस्तुरीरंगन सांबरा विमान तळावर आले असता या मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनींनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.

त्यांनी अटल ट्रिंकरिंग लॅबच्या बद्दल विद्यार्थीनींनी माहिती सांगितली त्याच बरोबर शाळेच्या लॅब बद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलीनी दिली. मुलींनी केलेलं स्वागत पाहून मला तूमचा अभिमान आहे असे त्यांनी उदगार त्यांनी काढले.अटल ट्रिंकरिंग केंद्र सरकारची योजना ती बालिका आदर्श मध्ये सुरू आहे याबाबत हिंदी आणि इंग्लिश मधून विद्यार्थिनीनी संवाद साधला.

K kasturirangan

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगांव जिल्हा विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृती समितीचे अध्यक्ष असलेले कस्तुरीरंगन यांना भेटून विमानतळावर भेट घेऊन सदिच्छा दिल्या.देशाच्या शैक्षणिक धोरणात माध्यमिक शिक्षक संघाचे तसेच अखिल भारतीय शैक्षिक महासंघाचे महत्व त्यांनी विषद करुन समाधान व्यक्त केले.

यावेळी शिक्षक आमदार अरुण शहापूर, विभागप्रमुख संतोष होन्नळी, राज्य सचिव आर.पी.वंटगुडी, बेळगांव जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव उमेश कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम कुडतूरकर, सहसचिव एल.बी. नाईक, खजिनदार सुरेश कळ्ळेकर, अटल शिक्षक रेवणकर, दीपा पाटील, प्राची पाटील, दिशा देसाई, नंदिनी पेडणेकर, कल्याणी बसूर्तेकर, अनुष्का जाधव, सानिया इनामदार, चिन्मयी चोडणकर, संस्कृती तिऊरवाडकर, स्नेहल गावडे याचबरोबर पी यु संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.