Sunday, December 22, 2024

/

मिलिटरी स्कुलचा विक्रांत ढाका ‘बेस्ट बॉक्सर’

 belgaum

बेळगावातील राष्ट्रीय मिलीटरी स्कुल येथे आयोजित अंतर्गत बॉक्सिंग स्पर्धेत अशोका हाऊस चॅम्पियन शिप पटकावले आहे.गेल्या तीन दिवसांपासून स्कुल अंतर्गत 14 वर्षा खालील व 17 वर्षा खालील अश्या दोन गटात बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला होता 14 वर्षा खालील गटात राजबहादूर,रुद्रानश, प्रियंशु,आदित्य हिमांशू,साहिल, विशाल अभय आणि अमित यांनी सुवर्ण पदक पटकावले.

17 वर्षा खालील गटात यशराज, यश ,आर्यन, रोशन,लविक,शशांक,राजराय, विक्रांत यांनी सुवर्णपदक मिळवले.अशोक सदन गटाला विजेता तर रणजित सदन गटाला उपविजेता घोषित करण्यात आला.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बद्दल विक्रांत ढाका याला बेस्ट बॉक्सर पुरस्कार देण्यात आला तर सुमंत ला बेस्ट लूजर किताब देण्यात आला.लेफ्टनंट कर्नल मोहन राय यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सी एम ओ एच कर्नल पद्मिनी श्रीनिवास यांनी बक्षिसे वितरण करत राष्ट्रीय मिलिटरी स्कुलच्या बॉक्सरांचा उत्साह वाढवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.