बेळगाव जिल्ह्यातून दोन माजी मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याचा प्लॅन काँग्रेसच्या नेत्यांनी बनवला असून संभाव्य उमेदवारांच्या यादीत या दोन माजी मंत्र्यांची नावे आली आहेत.राज्यातील 15 विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे बेळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी पोट निवडणूक होणार आहे त्यामध्ये अथनी मधून माजी मंत्री ए बी पाटील गोकाक मधून लखन जारकीहोळी तर कागवाड मधून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांचं नाव संभाव्य यादीत घालण्यात आलेला आहे.
राज्यात पक्षांतर करण्यासाठी राजीनामा दिलेल्या 17 आमदारांचे निलंबन झाल्यावर एकूण 15 ठिकाणी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे त्या सर्व 15 जागांवर काँग्रेसने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे बेळगाव जिल्ह्यातून कागवाड मधून माजी मंत्री आणि माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांना तर अथणी मधून माजी मंत्री ए बी पाटील यांना अशा या दोन माजी मंत्र्यांना काँग्रेस निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे या दोघांची संभाव्य यादीत नावे आहेत.प्रकाश हुक्केरी 2019 ची लोकसभा निवडणूक हरले होते त्यानंतर त्यांना राजकीय पुनर्वसन करण्यासाठी कागवाड मधून संधी मिळण्याची शक्यता आहे.
या व्यतिरिक्त गोकाक विधानसभा मतदारसंघातून रमेश जारकीहोळी यांचे निलंबन झाले आहे या मतदारसंघात त्यांचे लहान भाऊ लखन जारकीहोळी हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत त्यांचेही नाव संभाव्य यादीत असून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे.