बेळगावातील होणाऱ्या अधिवेशन आणि पुरग्रस्तांना मदतीवरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू असताना माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना टार्गेट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या समोर पुरग्रस्तांच्या समस्या मांडण्यात कर्नाटक भाजपचे नेते घाबरतात.आम्हाला बोलायला संधी दिल्यास उत्तर कर्नाटकातील पुरग्रस्तांच्या समस्या मांडू असा टोला सतीश जारकीहोळी यांनी लगावला आहे. बेळगावात शुक्रवारी सकाळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतेवेळी बोलत होते.
देशात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपा सरकार आहे मात्र कर्नाटकच्या जनतेला याचा काहीही उपयोग झालेला नाही केंद्राकडून पूरग्रस्तांना मदत आणण्यात राज्यातील भाजप नेत्यांना अपयश आले आहे केंद्राने अद्याप एक पैसाही निधी पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून दिलेला नाही असेही ते म्हणाले.
भाजपाने बेळगावात अधिवेशन घेऊन दाखवावे असे आवाहन करत हिवाळी अधिवेशन घेण्याचे धाडस कर्नाटक सरकारकडे नाही आहे असा देखील टोला माजी पालकमंत्र्यांनी लगावलाय. आंदोलक पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना घाबरून भाजप सरकारने बेळगावात होणारे अधिवेशन बंगळुरूला स्थलांतरित केला आहे असा आरोप देखील त्यांनी केला.
बेळगाव सह उत्तर कर्नाटकात आलेल्या पूर परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास कर्नाटक सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात कर्नाटक काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी होतील असेही त्यांनी नमूद केले.पूरग्रस्तांना वितरण केलेले चेक आणि ठिकाणी बाऊन्स झाले आहेत. घरे बांधण्यासाठी शेड निर्माण करण्यासाठी एन डी आर एफ मार्गसुचीची अडचण येत आहे महसूल मंत्री फक्त बेंगलोर पुरता मर्यादित आहेत अजूनही ते बेंगलोर बाहेर आलेले नाहीत त्यामुळे या पूर् ग्रस्तांना अडचणी येत आहेत असे त्यांनी नमूद केलं.
मी सांगेल त्याला गोकाक मधून काँग्रेसचे तिकीट मिळेल आणि मी विरोधी पक्ष नेत्यांच्या स्पर्धेत नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केलं लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बाबत विचारले असता ते म्हणाले की ‘जे कोणी चुकत आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे’ हेब्बाळकर या चौकशीला सामोरे जाण्यास सक्षम आहेत असेही ते म्हणाले.