सांबरा विमान तळ परिसरातील दहा गावातून मटण चिकन विक्रीस निर्बंध लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सांबरा परिसरातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. चिकण मटण विक्री बंदीचा आदेश हटवा अशी मागणी करण्यात आली आहे.विमान तळ प्राधिकरणाचे अधिकारी राजेशनकुमार मौर्य यांना विमान तळावर तसेच जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यांना डी सी ऑफिस समोर निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांनी बजावलेल्या एका आदेशानुसार सांबरा मुतगा निलजी शिंदोळी बसरीकट्टी,बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री,मोदगा, होनीयाळ,मारिहाळ सुळभावी आदि गावातुन मटण चिकन विक्रीस किंवा साठवण्यास बंदीचा आदेश दिला होता.
या मटण चिकन दुकानांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट होत नसल्याने या भागात मोठं मोठे पक्षी येत आहेत त्यामुळे विमान उड्डाणास समस्या येत असल्याचे कारण दिले होते.
शुक्रवारी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली या भागातील चिकन मटण दुकानदार आणि ग्रामस्थांनी सुरुवातील एअर पोर्ट डायरेक्टर राजेश कुमार मौर्य यांना निवेदन दिले या शिवाय बेळगाव डी सी ऑफिस समोर निदर्शन करत बंदीचा आदेश उठवण्याची मागणी केली.