जिल्हा पंचायती कडून आठवी ,नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येतात .या सायकली निकृष्ट दर्जाच्या असल्याने जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी सायकल वितरण बंद करून त्या सायकलींची चौकशी सुरू केली आहे.
बुधवारी येळ्ळूर येथे विद्यार्थ्यांना होणारा सायकल वितरण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.येळ्ळूर विभागातील 216 विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात येणार होत्या पण या सायकली निकृष्ट दर्जाच्या असल्या मूळे वितरण कार्यक्रम रद्द करून याची तक्रार जिल्हा पंचायत सी ई ओ यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
गोरल यांनी सदर बाब जिल्हा पंचायत सी ई ओ राजेंद्र यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. सी ई ओ त्यातील पाच सायकलींच्या नमुन्याची तपासणी करणार आहेत .त्या चालवण्यासाठी योग्य आहेत का याचा आढावा घेतला जाणार आहे.निकृष्ट सायकली बाबतीत जिल्हा पंचायतीत तीन वाजता बैठक आयोजित केली आहे. सरकारी निर्देशानुसार सायकली चालवण्यासाठी योग्य आहेत की नाही याचा तपास करून अहवाल बनवला जाणार आहे. त्या अयोग्य असल्यास पुन्हा बंगळुरूला पाठवल्या जाणार असून परत दुसऱ्या सायकली मागवल्या जाणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बंगळुरूच्या एजन्सी कडून सायकलींचे वितरण होते याची चौकशी रमेश गोरल यांनी लावली असून आता केवळ येळ्ळूर नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सायकलींची तपासणी होणार असून त्या नंतरच विद्यार्थ्यांत वाटप केल्या जाणार आहेत.येळ्ळूर मध्ये एकूण 216 सायकली पैकी वरील 16 सायकली देखील चालवण्या योग्य नाहीत .एक तर या सायकीलाना गंज धरला आहे, हँडल वाकडे आहेत ,चेन पडलेल्या ,हवा व्हॉल्व ट्यूब नसलेल्या सायकली अधिक आहेत दुसरीकडे रिम वाकलेल्या आहेत.