Saturday, December 21, 2024

/

येळ्ळूचे पै.मारुती कुगजी यांचे निधन

 belgaum

येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान भरवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे,तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष माजी पैलवान मारुती परशराम कुगजी वय 62. रा.शिवाजीनगर येळ्ळूर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शनिवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान घरी असते वेळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.

येळ्ळूर गावातील सीमा भागातील सर्वात मोठे कुस्ती मैदान भरवण्यात मारुती कुगजी यांचा सिंहाचा वाटा होता या महाराष्ट्र मैदानाचे ते अध्यक्ष होते.बेळगाव तालुका पंचायतीचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले होते सीमा प्रश्नांचा ठराव संमत केला म्हणून त्यांच अध्यक्ष पद रद्द करण्यात आले होते त्या काळी त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात मोठी लढाई लढली होती. येळ्ळूर ग्राम पंचायतीचे माजी सदस्य देखील होते.

केवळ एक दिवस गणेश उत्सव आगमन तोंडावर असताना त्यांचे निधन झाल्याने येळ्ळूर गाव आणि बेळगाव तालुक्यातील समाज कारणातील एक दिग्गज व्यक्तीमत्व हरपल्या सारखे आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.रविवारी दुपारी 12 वाजता येळ्ळूर स्मशान भूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. कुगजी यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणखी एक तळमळीचा कार्यकर्ता हरपला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.