पावसाची धार जोरदार वाढली आहे. खानापूर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. बेळगाव तालुक्यातील अशीच परिस्थिती आहे. यासंदर्भात योग्य ते निर्णय घेऊन मंगळवार आणि बुधवारी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्हा पंचायतीचे शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी शिक्षणाधिकार्यांकडे याबाबत सूचना केली होती. या संदर्भात शिक्षणाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे आपले म्हणणे मांडले .यानंतर जिल्हाधिकारीनी रामदुर्ग तालुका वगळता सर्वत्र सुट्टी जाहीर केली.
रस्ते व गावांचा संपर्क तुटल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला जाताना धोका होऊ शकतो. या गोष्टीचा विचार करून बेळगाव आणि खानापूर तालुक्यात मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात यावी असा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकार्यांसमोर मांडला होता. स्वतः रमेश गोरल यांनी सुचवलेल्या गोष्टीबद्दल उल्लेख केला. यानंतर लागलीच जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली.
जिल्हाधिकारीनी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शाळांना मंगळवार बुधवार असे दोन दिवस सलग सुट्टी दिली आहे.
पावसाचा जोर कमी होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे धोकादायक बनत असल्याचे रमेश गोरल यांचे म्हणणे आहे .यामुळे सध्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.