बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील सगळे नदी नाले तुडुंब भरल्याने नदीचे मोठे मोठे मासे छोट्या छोट्या नाल्यात वर चढू लागले आहे.शहरातील शास्त्रीनगर भागातील छोट्याश्या नाल्याचा पाण्यातून वाहून जाणारा मोठा मासा युवकांना सापडला होता.
शास्त्री नगर आठल्ये गल्लीत वाहून जाणाऱ्या नाल्यातून हा मासा बाहेर आला होता विजय बेळगावकर या युवकाने 12 किलो चा मासा पकडला होता.
काल शुक्रवारी सायंकाळी पाण्यामध्ये हा मासा(ढेकूळ) सापडला होता. रात्री त्याला टाकीत ठेवले होते आज सकाळी तो मासा मेला असून एक बंगाली कुटुंबाला देण्यात आला आहे. आठल्ये गल्लीत नाल्यातून आलेला हा मासा होता. हा भलामोठा ढेकूळ पाहण्यासाठी लोकांनी गर्दी होत होती.नाले तळी तुडुंब भरल्याने फिशिंगला गर्दी होताना दिसत आहे.