बेळगाव जिल्ह्यातील पुरपरिस्थितीने थैमान घातले आहे. या परिस्थितीत आपला दिल्ली दौरा रद्द करून कर्नाटकाचे मुख्यमंत्री एडीयुरप्पा बेळगाव दौऱ्यावर येऊन परिस्थित्तीची पाहणी करणार आहेत.
इंगळी, मांजरी, अथणी व येडुर याठिकाणी एस डी आर एफ चे 45 जण तैनात करण्यात आले आहेत.
भारतीय लष्कराचे 90 जवान आणि अग्निशामक दलाचे 75 जण तैनात करण्यात आले असून ते डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये प्रशिक्षित आहेत.
पोलीस दलालाही आवश्यक ठिकाणी दक्ष ठेवण्यात आले असून एकूण 8 ठिकाणी गंजी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
एकूण 30 बोटी सेवेत आहेत.
डिसी आणि एसपी ऑफिस चे कंट्रोल रम 24 तास कार्यात ठेवण्यात आले आहेत.
डिसी ऑफिस 0831 2407290
एस पी ऑफिस 0831 2405231 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूर परिस्थितीचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज असून आम्ही कोणतीही परिस्थिती आली तरी मार्ग काढण्यास सक्षम असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी कळविले आहे.