बेळगाव सह उत्तर कर्नाटकात आलेल्या पुराची पहाणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी दुपारी बेळगावला येणार असून मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांच्या सोबत एरियल सर्व्हे करणार आहेत.
अमित शाह दुपारी अडीच वाजता चेन्नईहून विशेष विमानाने बेळगाव सांबरा विमान तळावर पोहोचणार असून 2:45 ते 4:30 पर्यंत बेळगाव जिल्ह्यातील पुराची पहाणी करणार आहेत. भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने ते एरियल सर्व्हे करणार आहेत. सायंकाळी साडे चार ते पाच या वेळेत शासकिय अधिकाऱ्यां सोबत विमान तळ सभागृहात बैठक घेणार आहेत. पाच वाजता विशेष विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत.
शनिवारी अर्थ निर्मला सीतारामन यांनी हवाई पहाणी केली होती मात्र उत्तर कर्नाटकासाठी केंद्र सरकाराचे पॅकेज बाबत कोणतीच घोषणा केली नव्हती त्यामुळे रविवारी अमित शहा फ्लड पॅकेजची घोषणा करतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांनी अगोदरच केंद्राकडे 6 हजार कोटींची पुरग्रस्तांना मदत म्हणून मागणी केली आहे.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा दुपारी बारा वाजता सांबरा विमान तळावर येणार असून अधिकाऱ्यां सोबत बैठक घेणार आहेत दुपारी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सोबत असणार आहेत.