अतिपावसामुळे लोंढा ते तिनई घाट दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या खालून पाणी वाहू लागले होते. मंगळवारी पहाटे एकच्या दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर रेल्वे खात्याने जोरदार काम सुरू करून लवकरात लवकर रेल्वेमार्ग सुस्थितीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे .
रेल्वेचे जनरल मॅनेजर ए के सिंग, डीविजनल रेल्वे मॅनेजर राजेश यांनी आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी हे काम पूर्ण केले. न थकता न थांबता रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम केल्यामुळे रेल्वे सेवा पुन्हा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
या परिस्थितीने पटना वास्को-द-गामा , हुबळी वास्को-द-गामा ,हजरत निजामुद्दीन वास्को-द-गामा, बेंगलोर एक्सप्रेस आणि वास्को-द-गामा हावडा एक्सप्रेस तसेच अनेक रेल्वेच्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल झाला, मात्र आता यापुढील काळात सर्व रेल्वे वेळेवर जाऊ शकतील अशी व्यवस्था रेल्वेने केली आहे.