रविवारी सकाळी येळ्ळूर येथील फुटूक तलाव फुटल्याने तलावाचे पाणी शेतीत घुसले होते याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले होते.
रविवारी सायंकाळी तहसीलदार मंजुळा नायक यांनी पहाणी केली. उद्या सोमवारी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर पूर स्थितीचा आढावा घ्यायला येणाऱ्या मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊ असे आश्वासन दिले.
जि. पं. शिक्षण आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रमेश गोरल यांच्यासह जिल्हा पंचायत सहाययक अभियंते खानापुरी यांनी फुटूक तलावा सोबत अरवळी व इतर तलावांची पहाणी केली.जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून उन्हाळ्यात फुटूक तलाव दुरुस्त केला जाईल पाऊस कमी झाल्यावर वाळू घालून तात्पुरता डागडुजी करण्यात येईल मात्र उन्हाळ्यात तलाव पूर्णपणे दुरुस्त करू असे आश्वासन रमेश गोरल यांनी दिले.
तलाव फुटून ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील भात पिकाचे नुकसान झाले आहे याचा अहवाल तयार करून नुकसान भरपाई मिळवून देऊ असेही ते म्हणाले.तत्पूर्वी सकाळी तलाठी सर्कल आदींनी पहाणी करत तलाव फुटलेल्या घटनेचा पंचनामा केला होता यावेळी ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर, ता.पं सदस्य रावजी पाटील ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.