बेळगाव तालुक्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना याचा फटका सहन करावा लागला आहे. यामुळे अनेकांना पाऊस नको म्हणण्याची वेळ आली असताना बेळगाव तालुक्यातील तबलापूर येथे अतिवृष्टी झाली आहे. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. हे हेलिकॉप्टर लवकरच दाखल होणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
तुमरगुदी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या तबलापूर गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. अनेक घरात पाणी शिरून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही पूर स्थिती दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी एन डी एफ पथकाला पाचारण केले होते. मात्र मुसळधार पाऊस पडत असल्याने त्यांचाही नाईलाज झाला आहे.
ही परिस्थिती निवारण करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. मात्र पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा फटका नागरिकांना बसला आहे. काही नागरिक पाण्यात अडकल्यामुळे तातडीने हेलिकॉप्टर मागविण्यात आले असून आपत्कालीन विभागाला याची माहिती देण्यात आली आहे. हे हेलिकॉप्टर तातडीने दाखल होऊन येथील नागरिकांना सहकार्य करणार आहे. अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बळ्ळारी नाल्याचे पाणी तबला पूर गावात मोठ्या प्रमाणात शरीर यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही परिस्थिती निवारण्यासाठी मागील दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे तर काही नागरिक अजूनही अडकून पडले आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. तातडीने येथे हेलिकॉप्टर दाखल होऊन येथील नागरिकांना सहकार्य करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.