अपंगांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आयुष्यभर कार्यशील राहिलेल्या शकुताई परांजपे यांचे निधन झाले.त्या 82 वर्षाच्या होत्या.
अपंगांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे.अत्यंत साधी राहणी,वक्तशीरपणा आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करायचे ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती.फिजिकली हँडीकॅपड असोसिएशन संस्था स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
या संस्थेत अपंग व्यक्तीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करून अनेक अपंग व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली.त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार लाभले होते.त्यांनी देहदान केले आहे