कर्नाटकात बी एस येडीयुराप्पा यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारात जागा मिळवू न शकलेल्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर पुन्हा एकदा त्यांचेच बंधू सतीश जारकीहोळी यांनी टीका केली आहे.या सरकारला अस्तिवात आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या रमेश जारकीहोळी यांच्या हातून आज दुसरी वस्तू देखील निसटली असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
हुक्केरी तालुक्यातील पाचापुर गावात पत्रकारांशी बोलत होते. या सरकारमध्ये रमेश जारकीहोळी मंत्री होतील असे वाटतं होते मात्र त्यांचे मंत्री पद हुकले आहे या अगोदर एक वस्तू त्यांच्या हातून निसटली होती आता दुसरी वस्तूही त्यांच्या हाताबाहेर गेली असल्याची त्यांनी टीका केली आहे
बंडखोर आमदारांनी जे डी एस काँग्रेसचे सरकार घालवले होते त्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व रमेश जारकीहोळी यांनी केलं होतं त्यामुळे रमेश यांना उपमुख्यमंत्री पद मिळेल असा कयास राजकीय क्षेत्रात लावला जात होता.स्पीकर यांनी लावलेल्या बंदीच्या आदेशामुळे रमेश जारकीहोळी मंत्री पदाच्या रेस बाहेर गेले होते.
जे डी एस काँग्रेस सरकार कोसळताच सतीश जारकीहोळी यांनी सरकार केवळ वस्तू मुळे पडले आहे ती वस्तू कोणती आहे असे जाहीर करू असं वक्तव्य केले होते ‘पहिली वस्तू’ कोणती ते गुलदस्त्यात असताना सतीश यांनी पुन्हा ‘दुसऱ्या वस्तूचा’ उल्लेख केला आहे. त्यामुळे जारकीहोळी बंधूंच्या या ‘दोन्ही वस्तू’ कोणत्या आहेत याबद्दल चर्चा तर आहेच पण या वस्तू कोणत्या आहेत राजकीय जाणकारांना माहीत देखील आहे. सरकार पाडवलेली वस्तू आज हातून निसटलेली वस्तू याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.