वडगांव भागात एका घरासमोरील खुल्या जागेत बसलेल्या जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी धाड टाकत सात जुगाऱ्याना अटक करून त्यांच्या जवळील 77 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
मंगळवारी सायंकाळी शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी सिंघम स्टाईलने छापा टाकत सात जणांना अटक करून 77 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार वडगांव आनंद मार्ग वझे गल्ली मधील यल्लप्पा पालेकर यांच्या घरा समोरील खुल्या जागेत जुगार अंदर बहार इस्पिट खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जावेद आणि सहकाऱ्यांनी धाड टाकली सात जणांना अटक केली.
विजय शंकर सातपुते रा. श्रीनगर बेळगाव, शिवानंद अर्जुन काकतीकर रा. वडगांव, यल्लप्पा पालेकर रा. वझे गल्ली वडगांव,मंजुनाथ वासुदेव अन्वेकर रा.शास्त्रीनगर,किरण बाबूराव माघंडे रा.गवळी गल्ली,प्रवीण वसंत पाटील रा.संभाजी नगर वडगांव, विजय श्रीकांत तरळेकर रा. रामदेव गल्ली वडगांव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जुगार खेळताना त्यांच्या कडून 77 हजार 150 रोख रक्कम,124 खेळायचे पाने जप्त केली आहे. शहापूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.