मागील तेरा ते पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे. भात पिकाबरोबरच इतर पीकेही कुजली आहेत. मात्र काही डोंगर भागात असलेली पिके जोमात असून यामध्ये बटाटा पीकाला उघडीप मिळाल्यामुळे हे पीक बहरले आहे.
पावसाचा विचार करता कोणतेही पीक वाचणार नाही अशी दाट शक्यता होती. मात्र काही भागातील पिकांना फटका बसला असून तरी काही पिके वाचली आहेत. याच बरोबर सध्या बटाटा पीक तेजीत आले आहे. पोषक वातावरण निर्माण झाल्याने हे पीक शेतकऱ्यांना लाभ करून देईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही बटाटा पीक कुठले आहे तर काही पिके बहरली आहेत. विशेष करून बटाटा पिकाला उघडीप मिळाल्यामुळे याचा चांगला फायदा होणार आहे. यामुळे ही पिके सध्या जोमात असली तरी शेतकरी खत व इतर कामात गुंतला आहे.
बटाटा पिकाला खत व इतर कामे करण्यात शेतकरी गुंतला आहे. त्यामुळे सध्या शेतीकामात भर देण्यात आला असला तरी इतर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नदी व नाला परिसरातील भात पिके पूर्णपणे कुजली असून त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. विशेष करून डोंगर भागावर असलेल्या पिकांना मात्र धोका कमी असला तरी सध्या बटाटा पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.