बेळगाव जिल्ह्यात पुराने पाच लाख लोक प्रभावित झाले असून त्यांच्या मदतीसाठी वेगवेगळ्या स्तरातून मदत केली जात अनेक सामाजिक संस्था आहार जरुरी सामान पोचवण्याचे काम करत आहेत मात्र पुरग्रस्तांना जुने आणि वापरलेले कपडे देऊ नये केवळ नवीन कपडेच मदत म्हणून द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळळी यानी केलं आहे.
मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा अशी मागणी करायला गेले असता चर्चे दरम्यान ते बोलत होते. मदत म्हणून दिलेले जुने कपडे कुणी परिधान करणार नाहीत पुरग्रस्त आपले बंधुचं आहेत त्यामुळे मदत करणाऱ्यांनी नवीन कपडे द्यावेत असे ते म्हणाले.
नाले अतिक्रमणा बाबत बैठक
बेळगाव शहरात उदभवलेल्या परिस्थितीला नाल्या वरील अतिक्रमण जबाबदार आहे अतिक्रमण हटवा नाले सफाई वेळेत करा अशी मागणी करताच पुरग्रतांची समस्या मिटल्यावर यावर वेगळी बैठक करू असे आश्वासन दिले.शहरांत केवळ दोन मुख्य नाले आहेत इतर उप नाले त्यांच्या कडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.
हेस्कॉम अधिकाऱ्यांना निर्देश
बेळगाव तालुका आणि शहरात हेस्कॉम द्वारा घरे पाडलेल्यांचे कनेक्शन जोडून देण्यासाठी अतिरिक्त शुल्क डिपॉझिट आकारण्यात येत आहे हे बंद करून पुग्रस्तांना मोफत नवीन कनेक्शन जोडून ध्या अशी मागणी सरस्वती पाटील यांनी केली असता बोमनहळळी यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना अतिरिक्त शुल्क नवीन डिपॉझिट घेऊ नये अश्या सूचना दिल्या.मनपाला घर बांधणीसाठी तात्काळ परवाने देण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली.