हिरेबागेवाडी पोलिसांनी बेकायदेशीर रित्या नेण्यात येणारी 44 लाखाची चांदी जप्त केली आहे.जप्त केलेल्या या चांदीचे वजन 153 किलो आहे.
बागेवाडी टोल नाक्याजवळ हिरेबागेवाडी पोलिसांनी एक कार थांबवून तपासणी केली असता त्या कारमध्ये ही चांदी सापडली.एम एच 11 ए वाय 8811 असा कारचा क्रमांक असून कारमधून पाच जण चांदी नेत होते. हुपरी येथून ही चांदी तामिळनाडू येथील सेलमला ही चांदी नेण्यात येत होती.
पोलिसांनी कागदपत्रांची चौकशी केली असता त्या चांदीचा कर भरला नसल्याचे समजले.नंतर पोलिसांनी वाणिज्य कर खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावले.त्यांनी लगेच घटनास्थळी येऊन 264600 रु कर भरावा लागणार म्हणून सांगून प्रकरण नोंद केले आहे.