आमदार अनिल बेनके यांनी आज कोनवाळ गल्लीतील नाला परिसराची पाहणी करून या नाल्याची समस्या लवकरात लवकर सोडवा अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
नाला फुटून घरा घरात पाणी शिरल्याने समस्येत वाढ झाली आहे. नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. यावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांनी करताच आमदार बेनके आज या भागात दाखल झाले होते. गुडघाभर पाण्यातून वाट काढून त्यांनी नागरिकांशी बातचीत केली व ही समस्या लवकर सोडवून देतो असेही आश्वासन दिले आहे.आमदार यांच्या सोबत पालिका आयुक्त अशोक धूडगुंटी यांनी देखील या घरांची पहाणी केली.
पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने यापूर्वीचे सगळे विक्रम मोडीत काढायचे ठरवले आहेत असे दिसून येत आहे.सलग पाचव्या दिवशी देखील पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असून शहर परिसरातील नदी,नाले दुथडी भरून वाहत आहेत.
गेली अनेक वर्षे तुडुंब भरली नव्हती अशी तळी देखील या संततधार पावसामुळे भरून वाहू लागलेत यास बेळगाव शहर देखील अपवाद नाही आहे. पावसाच्या पहिल्या दणक्यात समर्थ नगर मध्ये नाला फुटून अनेक घरांत पाणी शिरले होते आज कोनवाळ गल्ली येथील नाला फुटून अनेक घरांत पाणी घुसले आहे.