बेळगाव येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे भूतकाळातील सर्व नोंदी मोडल्या आहेत. मतदारसंघातील अनेक भाग पाण्याने बुडले आहेत. शिवाजी नगर, पंजीबाबा व इतर भागात सकाळी 7 वाजल्यापासून आमदार अनिल बेनके स्वतः भेट देत आहेत.
पुरामुळे होणारा कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी डीसी, महानगरपालिका आयुक्त, तहसीलदार, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलिस आयुक्त यांच्याशी सतत संपर्क साधत आहेत. पुनर्वसन केंद्रे स्थापन केली आहेत. नागरिकांना माझ्या कार्यालयाशी थेट किंवा संपर्क क्रमांक 0831 2433733 वर संपर्क साधावा असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.
सकाळी त्यांनी शिवाजी नगर आणि परिसरात शिरलेल्या पाण्याची परिस्थिती आमदार अनिल बेनके यांनी पाहणी केली आहे .या ठिकाणी साचलेला कचरा हटवणे सांगून शिरलेले पाणी निचरा होण्यासाठी महानगरपालिकेने व संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची सूचना आमदार बेनके यांनी केली होती .