मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यात सर्वत्र विजेचा खेळखंडोबा सुरू होत असतानाच अनेक ठिकाणी मागील काही दिवसापासून विद्युत पुरवठा बंद अवस्थेत आहे. त्यामुळे लघुउद्योग उरावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहराबरोबरच तालुक्यातील दहाहून अधिक ट्रांसफार्मर निकामी झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. संपूर्ण तालुक्यात मागील सात ते आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परिणाम अधिक पाऊस झाल्याने शेती शिवारात आणि ट्रांसफार्मर असलेल्या ठिकाणी पाणी साचल्याने विद्युत नियंत्रण मंडळाचा ही नाईलाज झाला आहे.
अजूनही पूर ओसरला नसला तरी मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अधून-मधून सरी पडत असल्या तरी ज्या ठिकाणी ट्रांसफार्मर आहे त्या ठिकाणी जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे विज नियंत्रण मंडळाचे अधिकारी परिश्रम घेत आहेत. मात्र सुरळीत विद्युत पुरवठा होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ग्रामीण भागात मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे विज नियंत्रण मंडळाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत असली तरी नियंत्रण मंडळाने आपले परिश्रम कायम ठेवले आहेत. विविध ठिकाणी आणि काही तास वीजपुरवठा सुरू होईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. असे असले तरी तालुक्यात मात्र अजून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हेस्कॉमने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.