Sunday, December 22, 2024

/

समर्थनगराची केली आमदारांनी पहाणी

 belgaum

बेळगाव शहराच्या पूर्व भागात वसलेल्या उपनगरापैकी एक असलेल्या समर्थ नगर भागात उत्तर भागाचे आमदार अनिल बेनके यांनी भेट देऊन पाहणी केली.दर वर्षी समर्थ नगर हा परिसर पावसात बेट बनलेला असतो चारी बाजूनी पाणी आणि मध्ये घरं अशी स्थिती या भागातील अनेक घरांची असते.

दोन दिवसांपूर्वीच्या दमदार पावसाच्या दणक्याला समर्थनगर शेजारून वाहणारा लेंडी नाला फुटला होता आणि पाणी अनेक घरातून घुसले होते त्या दिवशी पासून या भागातील लोकांची तारांबळ उडत आहे महा पालिकेचा कुणी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी या भागाकडे फिरकला नव्हता अशी तक्रार वारंवार या भागातील लोकां कडून केली जात होती.समर्थ नगरच्या समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात अशी देखील मागणी करण्यात येत आहे

का फुटला नाला?
समर्थनगरात पावसाळ्यात दरवर्षी पूर येतो पाणी भरते मात्र यावर्षी पाऊस अधिक आहे त्या शिवाय शास्त्री नगर भागात नाल्याला भिंत बांधण्यात आली आहे त्यामुळे सर्व पाणी समर्थ नगर जवळून वाहून जात आहे त्यामुळे देखील पाण्याचा फ्लो वाढला आहे त्यामुळे नाला फुटून नाल्या नलगतच्या घरातून पाणी शिरले होते.

आमदारांनी केली पहाणी

शनिवारी सायंकाळी आमदार अनिल बेनके यांनी समर्थ नगर भागाला भेट देऊन पाहणी केली. नाल्या लगतच्या घराजवळील पाणी जे सी बी च्या साहाय्याने चर मारून काढण्यात आले.महापालिका अधिकाऱ्यांना आमदारांनी सुचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.