बेळगावमध्ये पडलेल्या पावसाने शहराचे चित्र बदलवून टाकले आहे. घरे, इस्पितळे आणि दुकानात शिरणाऱ्या पावसाच्या पाण्याने नुकसान केले आहे. अश्याच घटनेत रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील डेक्कन मेडिकल सेंटर मध्ये शिरलेल्या पावसाच्या पाण्याने नुकसान केले असून वैद्यकीय कागदपत्रे नष्ट झाली आहेत.
गटारीतून वाहणारे पाणी इस्पितळात शिरले आणि रेकॉर्ड रूम मध्ये गेले. रुग्णांचे केस पेपर, बिले आणि इतर कागदपत्रे त्या ठिकाणी ठेवली होती. जोर पाऊस झाल्याने 2000 पासून ठेवलेली ती सर्व कागदपत्रे पाण्यात भिजून खराब झाली आहेत.
इस्पितळाचे प्रशासक सिरील फर्नांडिस यांनी सांगितले की आर्थिक नुकसानही झाले असून त्याची मोजमाप सुरू आहे. नानावाडी, अरुण थिएटर आणि कॅम्प भागातून वाहणारे पावसाचे पाणी या भागात येते. आणि घरांमध्ये शिरते.
अशी घटना पुढे होऊ नये याची काळजी महानगरपालिकेने घ्यावी लागेल.