बेळगाव जिल्ह्यात पूर्णपणे निर्माण झालेली पूर परिस्थिती निवारण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर सज्ज झाले आहे. यासंदर्भात ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांनी बेळगाव live ला विशेष मुलाखत दिली.
वेगवेगळ्या भागात 50 50 जणांचे पथक पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण 300 हुन अधिक जवान यात कार्यरत आहेत. चिकोडी तालुक्यातील तीन भागांमध्ये 50 50 जणांची तीन पथके पाठविण्यात आली असून ती बचावाचे काम करत आहेत. त्याच बरोबरीने इंजिनिअरिंग पथक कार्यरत आहे .बेळगाव तालुक्यातील पूर परिस्थिती निवारण्यासाठीही दोन पथके तयार करण्यात आली असून ती पथके बचाव कार्य करत आहेत. त्याच बरोबरीने कारवार येथील नौदलाचे एक पथक दाखल झाले असून ते अकरा वाजता चिकोडी ला रवाना होणार आहे . बोटीतून बचाव करताना नौदलाची गरज भासली असून बोटीतून मदत कार्य करणाऱ्या पथकांना येणाऱ्या अडचणी निवारण्यासाठी नौदलाची पथके काम करणार आहेत.
बेळगाव सोबत बागल कोट विजापुर आणि कोल्हापूर मध्ये देखील सैन्य दलाची पथक रवाना झाली आहेत बुधवारी दुपारी बंगळुरू हुन सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी जनरल साहेब देखील बेळगावला येत आहेत असे ते म्हणाले.
त्याच बरोबर महिला सहकारी अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले असून ते सुद्धा मदतीचे काम करत आहे. भारतीय लष्कर फक्त युद्धात काम करत नाही तर स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्या निवारण्यासाठी भारतीय लष्कर महत्त्वाचे योगदान देते. त्यामुळे या वेळी किमान एक आठवडा आम्हाला आणखी मदत कार्य करावे लागेल आणि त्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे गोविंद कलवाड यांनी बेळगाव live शी बोलताना सांगितले