मन्नुर क्रॉस ते आंबेवाडी चारस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्ता एका बाजूने खचला असून याच्या वरून जाणे धोकादायक बनले आहे .संपूर्ण रस्ता कधीही खचू शकतो. आज जिल्हा परिषद सदस्य सरस्वती पाटील यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने दुरुस्त करा अशी विनंती केली आहे.
अतिपावसाने तयार रस्ता खचण्याची बेळगाव तालुक्यातील पहिलीच घटना आहे .अशा प्रकारच्या रस्त्यावरुन रात्रिच्या वेळी अनोळखी ने प्रवास केला तर त्यांच्या जिवावर बेतू शकते याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यायला हवे होते, मात्र आजपर्यंत लक्ष दिले नाही ही शोकांतिका समोर आली आहे.
मन्नुर क्रॉस ते आंबेवाडी रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा हीच मागणी असून त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहेकेवळ रस्ताच नव्हे तर रस्त्या शेजारील विद्युत खांब देखील आणि टी सी उखडून पडली आहे .रात्रीच्या वेळी या रस्त्यावर प्रवास करणे अवघड बनले आहे शासनाने याची दखल बनली आहे. लवकरच याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून याची जाणीव करून देऊ असे आश्वासन सरस्वती पाटील यांनी दिले आहे.