सदर्न कमांडचे कमांडर इन चीफ सत्येन्द्र कुमार सैनी यांनी भेट दिली त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी व आर्मी वाईफ असोसिएशनच्या प्रादेशिक अध्यक्ष नीना सैनि या सुद्धा उपस्थित होत्या.
सत्तावीस अठ्ठावीस दोन दिवस यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. कर्नाटका कमांडचे जनरल ऑफिसर के बाबू आणि एम एल आय आर सी चे ब्रिगेडियर गोविंद कालवड यांनी त्यांचे स्वागत केले. सत्येन्द्र कुमार हे 38 वर्षांपासुन लष्करी सेवेत असून त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे .महत्त्वाच्या पदांवरील भरती प्रक्रियेवेळी योग्य व्यक्तीची निवड करण्यात ते माहीर समजले जातात.
बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांची त्यांनी माहिती घेतली याच वेळी त्यांच्या पत्नीने बेळगाव आणि परिसरातील अधिकारी, युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी आणि माता यांची भेट घेऊन चर्चा केली.