बेळगाव शहरातील एस जी बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या काही विद्यार्थ्यांनी प्रा सागर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बेळगाव शहराच्या प्रदूषणाची पाहणी करून एक अभ्यास केला आहे.
अति प्रदूषित ते मध्यम प्रदूषित त्यामधील ठिकाणी बेळगावचे प्रदूषण असल्याचे या अभ्यासात सिद्ध झाले आहे. प्राध्यापक वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील या समुहाने बेळगाव शहरातील 27 ठिकाणी हवेची नमुने घेऊन तपासणी केली असून त्यापैकी सहा ठिकाणे मध्यम प्रदूषित असल्याचे आणि 12 ठिकाणे अतिशय प्रदूषित असल्याचे त्यांना आढळले आहे. काही निवासी आणि औद्योगिक ठिकाणे अति प्रदूषित असल्याची माहिती त्यांनी अभ्यासाद्वारे शोधून काढली.
बेळगाव हे पूर्वी एक गाव होते. शहराकडे वाटचाल करताना विकास वाढत उद्योगधंदे आले. वाहने वाढली आणि अलवारपणे प्रदूषित शहराकडे वाटचाल सुरु झाली. हवामानात बदल झाला त्यामुळे जास्त उकाड्याने हैराण करणारे उन्हाळे आणि थंडीत अति थंडी व पावसाळ्यात अति पाऊस वाढला असल्याचे अभ्यासातून बाहेर आलेले आहे. प्रदूषण वाढत चालले आहे हा धोका यातून दिसत असून बेळगाव शहराचे संपूर्ण हवामान प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे.
या वेळेमध्ये लोह मँगनीज तांबे पारा झिंक हे धातु आणि काही इतर घातक पदार्थ आढळले आहेत. 27 ठिकाणांची शास्त्रीयदृष्ट्या पाहणी केल्यानंतर त्यापैकी 13 ठिकाणे प्रदूषणाच्या जास्त धोक्याची ठिकाणे झालेली असून धोका वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. बेळगाव शहरातील नागरिकांचे सरासरी वयोमान 65 वर्षे झाले असून मानवी शरीरालाही व आरोग्यावर हवामान परिणाम करत आहे. दिल्ली बेंगलोर या शहरांबरोबरच बेळगाव सुद्धा वाढत आहे आणि त्याचबरोबर प्रदूषणाचा धोकाही वाढत आहे. हेसुद्धा या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी गाझियाबाद सारखी शहर प्रदूषणात देशात अव्वल असायची त्या यादीत बेळगावचा क्रमांक खूप मागे आताच्या यादीत या गरिबांचे महाबळेश्वर म्हणून गणल्या जाणाऱ्या शहराचे प्रदूषणाचे रँकिंग वाढले असेल याचा सर्व बेळगावकरांनी विचार करायला हवा…अन्यथा एक दिवस बेळगावचे गाझियाबाद व्हायला वेळ लागणार नाही