Sunday, January 5, 2025

/

खानापूर तालुक्यात रेकॉर्ड तोड पाऊस

 belgaum

आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत खानापुरात पावसाने आज नवा उच्चांक नोंदविला. मलप्रभेसह सर्वच नद्या पात्राबाहेर वाहत असून खानापूर शहरात तर मलप्रभा नदीचे पात्र विविध वसाहतींमध्ये घुसले आहे. दुर्गानगर आणि मारुती नगर हा भाग महापुरामध्ये सापडला असून नदी काठावरील अनेक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरांतर्गत बेळगाव गोवा महामार्गावर असलेला नवीन पूल पाण्याखाली गेला असून या पुलावर पाच ते सहा फूट पाणी आले आहे. त्यामुळे नंदगड आणि लोंढा परिसरातील सर्व गावांचा खानापूर शहराशी संपर्क बंद झाला आहे. यापूर्वी 1953 मध्ये अशा प्रकारच्या पूर परिस्थितीचा सामना करावा लागला असल्याची आठवण ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांकडून सांगितले जात आहे.

Main malprabha Bridge

फ़ोटो:खानापूर मधील मलप्रभा नदीच्या पुलावर सहा फूट पाणी भरून नदी वाहत होती त्यामुळे आलेला पूर दिसत नसलेला रस्ता  ब्रिज)

यडोगा, मणतुर्गे, आसोगा, जांबोटी, हबनहट्टी, हतरगुंजी, मळव येथील पूल पाण्याखाली गेल्याने बस व सर्व प्रकारचे प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे.
नदी काठावर वसलेल्या वसाहतींमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांची पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. सायंकाळी महामार्गावरील मासळी मार्केट पर्यंत नदीचा प्रवाह वाढला होता त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेड्स लावून महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे.

बेळगावात 600 घरांची पडझड तीन बळी

बेळगाव दि 6 :सतत होत असलेल्या पावसाने कोयना आणि महाराष्ट्र तुन कृष्णा नदी द्वारा होत असलेल्या अतिरिक्त पाण्याने बेळगाव जिल्ह्यात थैमान घातले आहे. जिल्ह्यातील सर्व नदी नाले तलाव दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात 600 घरांची पडझड झाली असून तीन बळी गेले आहेत अशी माहिती डी सी बोमनहळळी यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी कागवाड चिकोडी मुडलगी हुक्केरी रायबाग गोकाक आणि खानापूर तालुक्यातील 96 गावे पुराने प्रभावित झाली आहेत. मदत कार्य म्हणून विविध ठिकाणी 23 अन्न पुरवठा केंद्र बनवली असून 80590 हेक्टर पिकाऊ जमीन पाण्याखाली गेली आहे. जवळपास 1100 की मी रस्ता,160 लहान पुलं,6 सरकारी बंधारे,2571 विद्युत खांबे प्रभावित झाले आहेत.

अग्निशामक दलाचे 65,हेस्कॉमचे 66 होम गार्ड 19,एन डी आर एफ 100 तसेच आर्मीचे 150 जवान मदत बचाव कार्यात गुंतले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.