शेतकऱ्यांचा विरोध डावलून अट्टाहासाने या शहरातून जाणारा बायपास रोड बेळगावच्या दृष्टीने गळफास ठरणार आहे. बेळगावच्या या वर्षीच्या पावसाने राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.
पण त्यांचे डोळे उघडणार आहेत की नाहीत हे पाहिले पाहिजे. वडगाव शिवार व परिसरातून हा बायपास जात आहे. तेथे आजमितीला पावसाने पाच ते सहा फूट पाणी उभे केले. आजूबाजूचे रस्ते खचले आहेत. ज्या भागातून बायपास जाणार आहे ती काळी जमीन आहे. त्यामुळे ज्याला घर नाही. जर बायपास जमीन पातळीने केला तर दरवर्षी रस्ता पाण्याखाली जाणार आहे. त्याचप्रमाणे तो खचणार आहे आणि जर रस्त्याची उंची वाढवली तर दोन्ही बाजूने तलावाच्या सांडपाण्याचे व खालून बळ्ळारी नाल्याचे पाणी अडून पाण्याची फुग येळ्ळूर गावात व वडगाव भागात होणार आहे.
या वर्षीच्या पावसाने अतिक्रमित बांधकामाचे अनेक धोके सूचित केले आहेत. या नवीन संभाव्य धोक्याची जाणीव राज्यकर्त्यां बरोबरच नागरिकांनी करून घेतली पाहिजे .नाहीतर भविष्यातले पावसाळे खासबाग वडगाव जुने बेळगाव यांना कठीण परिस्थितीत नेणारे होणार आहेत.जर का असे झाले तर या भागातील कच्च्ची मातीची सगळी घरे कोसळली जाणार नक्की.
बरोबर नाल्यांच्या आजूबाजूला कुठे पर्यंत बांधकाम करायचे निश्चित करून अनधिकृत बांधकामे काढण्याचा कठोर निर्णय प्रशासनाला घ्यावा लागेल. एन ए ले आऊट विना झालेल्या अनधिकृत बांधकाम हटवणे गरजेचे आहे .कोणाच्या अट्टाहासामुळे शहराला वेठीस धरणे परवडणारे नाही.
-गुणवंत पाटील